बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लज्जास्पद! ऑक्सिजनसाठी सेक्सची मागणी; सोशल मीडियावर संतापाची लाट

मुंबई | घरातल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यावर सर्वत्र चिंतेचं आणि तणावाचं वातावरण तयार होतं. या काळात काय करावं सुचत नाही. या संकट काळात काही लोक धावून येतात. पण काही लोक भितीपोटी मदत करण्यास तयार होत नाहीत. आता कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर्सचा शोध घेणाऱ्या मुलीकडे शेजाऱ्याने सेक्सची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराविरोधात सोशल मीडियात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

एक पीडित मुलगी आपल्या कोरोनाग्रस्त पित्यासाठी ऑक्सिजनचा शोध घेत होती. अनेक ठिकाणी चौकशी करून देखील मुलीला ऑक्सिजन मिळाला नाही. त्यानंतर मुलीने तिच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडे ऑक्सिजनची मागणी केली. त्यानंतर त्या नराधमानं मुलीकडे ऑक्सिजन सिलिंडर्सच्या बदल्यात सेक्सची मागणी केली. त्यानंतर त्या मुलीनं ही गोष्ट आपल्या मैत्रिणीला सांगितली.

या प्रकाराबाबत एका तरुणीने सोशल मीडियातून वाचा फोडली आहे. त्यानंतर तिने यासंदर्भात पोस्ट करताच सोशल मीडियातील हजारो तरुण-तरुणींनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. भावरीन कंधारी नावाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रश्न उचलून धरला आहे. त्यांनी ट्विटरवर #HumanityIsDead अशी मोहिम चालवली आहे. तसेच नराधमाला कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी अनेकांनी केली आहे.

दरम्यान, कोरोनाकाळात अनेकांनी गरजू लोकांना मदत केली आहे. तर अनेक लोकांनी लोकांच्या मदतीसाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं आहे. व्यक्तीच्या गरजेचा फायदा घेणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

ऐकावं ते नवलच! फॅार्च्युनर गाडीतून वांग्यांची विक्री, पाहा व्हायरल व्हिडीओ-

“गाय मालकावर नाराज झाली, तरी ती खाटीकाच्या घरी जात नाही; आम्ही मोदींसोबत आहोत”

यशस्वी बिझनेसवुमन आणि टाइम्स ग्रुपच्या चेअरपर्सन पद्मभूषण इंदू जैन यांचं निधन

धनंजय मुंडेसोबतच्या नात्याचा पुस्तकातून करणार उलगडा; दुसऱ्या पत्नीची फेसबुक पोस्ट चर्चेत

“एक दिवस रिषभ पंत भारताचा सर्वोत्तम कर्णधार असेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More