बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शमी त्यांना माफ कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत”

नवी दिल्ली | आपल्या देशात कधी कोणता मुद्दा चर्चेत येईल हे सांगता येत नाही. सध्या धर्माच्या नावावरून खेळाडूना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत असल्यानं अनेक दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली आहे. आताही देशभर सोशल मीडियावर हिंदू-मुस्लीम ट्रोलर्सचा धुमाकूळ दिसत आहे. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर अनेकांनी मोहम्मद शमीला ट्रोल केलं या प्रकरणी आता काॅंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शमीच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे.

मोहम्मद शमीवर भारत पाकिस्तान सामन्यातील कामगिरीवरून प्रचंड टीका केली जात आहे. अशावेळी शमीच्या बाजूनं देशभरातील नेते आणि खेळाडू उभं टाकले आहेत. अशाच आता काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आम्ही तुझ्यासोबत आहोत, या शब्दात शमीची पाठराखण केली आहे. हे लोक द्वेषाने भरलेले आहेत कारण त्यांना कोणीही प्रेम देत नाही. त्यांना क्षमा कर, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यानंतर शमीवर पाकिस्तानकडून पैसे घेऊन खेळल्याचा आरोप ट्रोल करून करण्यात आला आहे. तसेच भरपूर जणांनी शमीला त्याच्या धर्मावरून सुनावलं होतं. परिणामी आपल्या देशात सध्या शमीच्या समर्थकांमध्ये आणि ट्रोलर्समध्ये जोरदार सोशल मीडिया युद्ध सुरू आहे. त्यातच 24 तारखेला भारत-पाकिस्तान सामन्यात भारताचा पराभव झाल्यानं सोशल मीडियावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ट्रोल करण्यात आल्यानं देशभरातून ट्रोल करणाऱ्यांना फटकारलं जात आहे.

दरम्यान, भारत पाकिस्तान सामना झाल्यानंतर देशातील चांगलं वातावरण कलूषीत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सुद्धा अनेक दिग्गजांनी केला आहे. अशातच राहुल गांधी यांच्या ट्विटची चर्चा देशभर होत आहे.

पाहा ट्विट –

थोडक्यात बातम्या 

“बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील”

“…म्हणून या नाना पटोलेला गरिबाचं दु:ख जास्त कळतं”

आयपीएलला मिळाले 2 नवे संघ! आयपीएल इतिहासातील विक्रमी बोली लागली

”ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल करणार’; नितेश राणेंचा थेट इशारा

अफगाणिस्तानवर पुन्हा संकट! संयुक्त राष्ट्र संघाने दिला ‘हा’ गंभीर इशारा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More