बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्या तर…’; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याची खुली ऑफर

बीड |  मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने प्रीतम मुंडे यांच्यासह पंकजा मुंडेही नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र पंकजा मुंडेंनी यावर स्पष्टीकरण देत नाराज नसल्याचं म्हटलं होतं. मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी पंकजा मुंडे नाराज असल्याचं म्हणत गौप्यस्फोट केला होता. अशातच ठाकरे सरकारमधील गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिली आहे.

पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्या आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा त्यांच्याकडे आहे आणि त्या जर शिवसेनेमध्ये आल्या तर नक्कीच शिवसेनेमध्ये त्यांचे स्वागत होईल आणि त्यांचा योग्य मानसन्मान हा आमचे नेते करतील, असं शंभुराजे देसाई म्हणाले. शंभुराजे देसाई बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

मंत्रिपदाची मागणी हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार नाहीत. मला कधी वाटलं नाही, मला मंत्री करा संत्री करा. माझ्या समाजाच्या मंत्र्याला मी कशाला अपमानित करू. प्रीतमताई मंत्री नाही झाल्या. मी 45 वर्षांची आहे. कराड साहेब 65 वर्षाचे आहे. मी त्यांचा अपमानित करणार नसल्याची प्रतिक्रिया पंकजा मुडेंनी भागवतांना मिळालेल्या मंत्रिपदावर दिली होती.

दरम्यान, शंभुराज देसाईंनी दिलेल्या ऑफरवर भाजप नेते आणि पंकजा मुंडे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन करु, म्हणणाऱ्या अण्णांची फडणवीसांच्या भेटीनंतर भूमिका बदलली”

अनिल देशमुखांच्या मालमत्ता जप्तीनंतर काँग्रेसचे थेट ‘ईडी’ला प्रश्न

‘कुणी चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करायचं तर कुणी कमरेवर हात ठेवायचं’; भारतीचा धक्कादायक खुलासा!

महाराष्ट्रात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, पण धोका अद्याप टळलेला नाही! 

‘शरद पवार गुगली टाकण्यात एक्सपर्ट’; काँग्रेसच्या या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More