Shani Gochar 2024 | ऑक्टोबर महिन्याच्या 3 तारखेला कर्मफळदाता शनीने राहूच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश केला आहे. शनी 27 डिसेंबरपर्यंत याच नक्षत्रात असणार आहेत. शनी राशीनुसार वेळोवेळी नक्षत्र परिवर्तन करतो. याचाच परिणाम सर्व 12 राशींवर होतो. त्यामुळे शनीचा शतभिषा नक्षत्र प्रवेश कोणत्या राशींना (Zodiac Signs) लाभ आणि कोणत्या राशींना आव्हानात्मक देणारा असेल ते पाहुयात. (Shani Gochar 2024)
‘या’ राशीसाठी पुढील काही दिवस संकटांचे असणार
मेष रास : या राशीच्या लोकांना शनीचं नक्षत्र परिवर्तन फार लाभदायक असणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. तसेच, व्यापारी वर्गाला चांगले दिवस येतील. तुमचे वैवाहिक जीवन चांगले असेल. तुमच्या आरोग्याचा समस्या दुर होतील.
मिथुन रास : या राशीच्या व्यक्तींना देखील शनीचं शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणं फार शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे. अनेक दिवासांपासून कोर्ट कचेरीच्या संदर्भात तुमचे सुरु असलेले वाद लवकरच संपतील.तुमचा नोकरीचा शोध देखील या काळात पूर्ण होईल. तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी चालून येईल. (Shani Gochar 2024)
सिंह रास : या राशीसाठी शनीचे नक्षत्र परिवर्तन सामान्य असणार आहे.मात्र, तुमचा अनेक वर्षांपासून वडिलोत्पार्जित संपत्तीचा सुरु असलेला वाद या काळात आणखी वाढू शकतो. तुम्हाला व्यवसाय संबंधी देखील अडचणींचा सामना करावा लागू शकतो. झटपट निर्णय घेऊ नका. विचार करून निर्णय घ्या.
कन्या रास : या राशीसाठी हा काळ आव्हानात्मक असणार आहे. तसेच, अनेक नकारात्मक विचार तुमच्या मनात येतील. तुम्हाला नकारात्मकतेची भावना जाणवेल. आरोग्य बाबतीत देखील तक्रारी जाणवू शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे पदार्थ खाऊ नका. सकारात्मक विचार करा. (Shani Gochar 2024)
मकर रास : शनीचे नक्षत्र परिवर्तन या राशीसाठी फायद्याचे ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. तुमचे प्रमोशन होऊ शकते. कुटुंबात आनंदाची वार्ता मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध आणखी सुधारतील.
News Title – Shani Gochar 2024
महत्वाच्या बातम्या-
राज्यावर पुन्हा अस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणार!
RBI ने सर्वसामान्यांना दिला मोठा धक्का!
आज रंगणार भारत विरुद्ध श्रीलंका सामना! टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार?
दसऱ्याच्या आधीच सोनं झालं स्वस्त?, काय आहेत सध्या 10 ग्रॅमचे भाव?
“महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होणार”; देवेंद्र फडणविसांचा विश्वास