मुंबई | बाॅलिवूड अभिनेता संजीव कपूर यांची मुलगी शनया कपूर लवकरचं बाॅलिवूडमध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. एवढचं नाही तर या चर्चेनंतर अनेक लोक शनया कपूरला सोशल मीडियावर सर्च करत आहेत. तसेच शनया देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
बाॅलिवूडचं प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊस ‘धर्मा प्रोडक्शन’ शनयाला लाँच करणार आहे. शनया तिच्या सोशल मीडियावर सतत फोटोझ शेअर करत असते. यातच तिने आता नवीन फोटोशूट इंस्टावर शेअर केलं आहे. या फोटोशूटनंतर शनया कमी तर शनयाच्या बिकनीची किंमत मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे.
शनयाने फोटोमध्ये घातलेली बिकनी ही फ्लोरल असून तिने त्यावर श्रग देखील परिधान केला आहे. मात्र या बिकनीच्या टाॅप पिसची किंमत ही 45 हजार 500 रुपये असून त्याच्या बाॅटमची किंमत 36 हजार 300 रुपये इतकी आह. म्हणजे एकूण 90 हजार रुपयांचा हा बिकनी सेट आहे.
दरम्यान, बिकनी शूटमधील हे फोटोझ शनयाने बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याची माहिती देत शेअर केला आहे. एवढचं नाही तर 1 लाख पेक्षा जास्त लोकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. तसेच अनेकांनी या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस देखील केला आहे.
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या-
‘केरळमध्ये लोक उच्चशिक्षित असल्यानं भाजपला मत देत नाहीत’; ‘या’ भाजप नेत्याचा घरचा आहेर
मन सुन्न करणारी घटना; सख्ख्या आईच्या संमतीने 15 वर्षांच्या मुलीवर 30 जणांनी केला बलात्कार
“पेशवाई आणण्यासाठी धुंद झालेले ‘बंटी बबली’ आता राजकारणात धुमाकूळ घालत आहेत”
शहीद जवानाला अवघ्या 1 वर्षाच्या लेकीने दिला मुखाग्नी; संपूर्ण देश हळहळला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.