राणेंसोबत शिवसेना सोडली हा आमचा मुर्खपणा; माजी आमदाराची खंत

मुंबई |  माझं राजकीय अस्तित्व नारायण राणेंनी संपवलं. राणेंसोबत शिवसेना सोडून मी मूर्खपणा केला, अशी खंत माजी आमदार शंकर कांबळी यांनी बोलून दाखवली.

शिवसेनाप्रमुखांनी राणेंना मुख्यमंत्रीपदी बसवलं. पण राणेंनी त्यांच्याशी गद्दारी केली आणि काँग्रेसवासी झाले, असं टीकास्त्र त्यांनी राणेंवर सोडलं.

शंकर कांबळी नारायण राणेंंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. त्या काळात त्यांनी राणेंबरोबर शिवसेना सोडली होती.

दरम्यान, यावर आता नारायण राणे काय प्रत्युत्तर देणार याकडे कोकणवासियांचं लक्ष लागलंय.

महत्त्वाच्या बातम्या

“राष्ट्रवादीचे 10 पेक्षा जास्त खासदार निवडून आल्यास शरद पवार पंतप्रधान होतील”

-देशाची राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याएवढं सोपं नाही; धनंजय मुंडेंचा पंकजांवर निशाणा

-पाण्यावरुन राजकारण करणाऱ्यांनो पुणेकर तुम्हाला नक्कीच पाण्यात बुडवणार- गिरीश बापट

-अमरावतीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे!

पुण्याला ‘योग सिटी’ अशी ओळख मिळवून देणार; गिरीश बापटांची ग्वाही