Shankaracharya | शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद (Shankaracharya Avimukteshwaranand) महाराज हे त्यांच्या वक्तव्यामुळे सध्या चर्चेत राहत आहेत. अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा करण्यास विरोध करणाऱ्यांमध्ये स्वामी अविमुक्तेश्वरानंद देखील होते. तेव्हापासून ते अधिक चर्चेत आले आहेत. मात्र, आता शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत.
यावेळी त्यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभेतील भाजपची खासदार अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी कंगनावर काही आरोप केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शंकराचार्य स्वामी चर्चेत आले आहेत.
काही दिवसांपूर्वीच शंकराचार्य स्वामी यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांची चर्चा झाली होती. अशात त्यांनी कंगना राणौतवर गंभीर आरोप केल्याने त्यांचं नाव पुन्हा समोर आलंय. त्यांनी म्हटलं आहे की, कंगना राणौतच्या चेहऱ्याकडे पाहणंही त्यांच्यासाठी पाप आहे. तसंच कंगनाने हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोपही शंकराचार्य (Shankaracharya) यांनी केला आहे.
शंकराचार्य यांनी काय आरोप केले?
एका मुलाखतीमध्ये बोलताना कंगना राणौतवरील गोमांस खाण्याच्या आरोपावर शंकराचार्य यांनी म्हटले की, “तिच्यावर कोणीही आरोप केलेला नाही, तिनं स्वतः हे मान्य केलं होतं. ही गोष्ट जगजाहीर आहे. याबाबत आतापर्यंत कंगनाने कोणतीही खंत व्यक्त केलेली नाही आणि पश्चात्ताप केलेला नाही.”, असं शंकराचार्यांनी (Shankaracharya) म्हटलं आहे.
शंकराचार्य स्वामी कंगनावर भडकले
5 वर्षांपुर्वी खासदार होण्याअगोदर कंगनाने वक्तव्य करुन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या, त्यावरही शंकराचार्य यांनी प्रतिक्रिया दिलीये. “आम्हाला अशा व्यक्तीचा चेहरा बघायचा नाही, आम्हाला पाप लागेल. अशा व्यक्तीचं नावही घ्यायला आम्हाला आवडणार नाही.”, असं ते (Shankaracharya) म्हणाले आहेत.
दरम्यान, कंगनाने 2019 मध्ये तिच्या एका ट्विटमध्ये गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं, त्यानंतर अभिनेत्रीच्या वक्तव्यावर बराच गदारोळ झाला होता. तिच्यावर गोमांस खाल्ल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यावरच शंकराचार्य स्वामी यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.
News Title- Shankaracharya Statement On Kangana Ranaut
महत्वाच्या बातम्या-
आज ‘या’ राशी होतील धनवान; गुंतवणुकीतून मिळेल बक्कळ पैसा
“खड्ड्यांचं पुणं झालंय, त्यांना खड्डापुरुष पुरस्कार द्या”; उद्धव ठाकरे गडकरींवर बरसले
“अमित शाह म्हणजे अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज”
‘मी ढेकणांच्या नादी लागत नाही’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
EPFO मधील कोट्यवधी खातेधारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; आता PF…