Top News

गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

गांधीनगर | गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. वाघेला यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर राष्ट्रवादीनेही दुजोरा दिला आहे.

शंकरसिंह वाघेला यांनी भाजपमधून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. 1996 मध्ये त्यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना काँग्रेसने मुख्यमंत्री केलं.

नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसला राम राम ठोकला होता. आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील. त्यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला गुजरातमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-नितीन गडकरी यांनी ते वक्तव्य मोदींना उद्देशूनच केलं- काँग्रेस 

-उपाशीपोटी पुण्याच्या रस्त्यावर बसलेल्या शेतकऱ्यांना जेवण आणा! 

-…म्हणून भर थंडीतही शेतकरी पुण्याच्या रस्त्यावर मुक्काम ठोकणार

-जालन्यात भाजप नेत्याची शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण

-शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार; अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या