बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सत्तेसाठी भाजप कोणतीही तडजोड करतोय’; ‘या’ भाजप नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

शिमला | भाजपच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य तसेच वरिष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी पक्षाच्या धोरणांवर टीका केली आहे. भाजप सत्तेसाठी कोणतीही तडजोड करतोय, असं शांता कुमार यांनी म्हटलं आहे.

शांता कुमार यांचं आत्मकथन असलेल्या ‘निज पथ का अविचल पंथी’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

भारतीय जनता पक्ष राजकीय प्रदुषणाचा बळी पडत आहे. ही केवळ सुरुवात आहे. राजकीय प्रदुषणाचा माझ्यासारख्या काही जणांना अतिशय त्रास होतोय. आम्ही काम केलेला आणि वाढवलेला हाच भाजप पक्ष आहे का?, असं अनेकदा मनात येतं, असंही शांता कुमार म्हणाले.

एक काळ होता, जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख नेते भाजपची धोरणे आणि सिद्धांत यावर लक्ष ठेवून असायचे. भाजपने सिद्धांताशी तडजोड करू नये, यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करायचे. मात्र, हळूहळू संघाचे मार्गदर्शन कमी होऊ लागले आहे. एकूण परिस्थिती पाहता अतिशय चिंता वाटते, असं शांता कुमार यांनी सांगितलं.

शांता कुमार यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला कुशल नेतृत्व लाभलं, असं शांता कुमार यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

बीडमध्ये मंगलाष्टकांऐवजी वंदे मातरम या गीतावर पार पडला विवाह, धनंजय मुंडे म्हणाले…

“स्वच्छ चारित्र्याचे असतील तर ते लपले कशाला?”

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला बाथटबमधील फोटो!

कुलू मनालीला फिरायला जायचं का?; पूजा-गबरुशेठ मधील नवीन संभाषण समोर आल्यानं खळबळ

नव्या लुकसह ‘मारूती सुझुकी स्विफ्ट’ लवकरच बाजारात धडकणार; जाणून घ्या किंमत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More