‘पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी इतके कोटी रूपये घेतले’; शांता राठोडांचा मोठा गौप्यस्फोट-
मुंबई | पूजा चव्हाणची चूलत आजी शांता राठोड यांनी पूजाच्या आई वडिलांवरच गंभीर आरोप केला आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी संजय राठोड यांच्याकडून 5 कोटी रुपये घेतले, असा आरोप शांता राठोड यांनी केला आहे.
पूजा चव्हाणच्या आई-वडिलांवर खूप दबाव आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी संजय राठोड यांनी पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना पाच कोटी रूपये दिल्याचा गंभीर आरोप शांता राठोड यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे.
पूजाच्या आई-वडिलांनी घरातच ते 5 कोटी रुपये पुरून ठेवले आहेत. त्यांच्या घरात जावया-जावयांमध्ये भांडण सुरू आहेत. पूजाचे आई-वडील हे पैशापोटी बोलत आहे, मुख्यमंत्र्यांनी पूजाला योग्य तो न्याय द्यावा, अशी विनंतीही शांता राठोड यांनी केली आहे.
पूजाच्या आई वडिलांनी पैशापोटी स्वत:च्या लेकराची किंमत केली नाही. त्यांना चुलत आजीबद्दल काय वाटणार? समाजाची दिशाभूल झालेलीच आहे. आता पूजाचे आई-वडील मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत. पूजाचे आई वडील खोटं बोलत आहे, असं शांता राठोड यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
संजय राऊतांनी केलं राहुल गांधींचं कौतुक, म्हणाले…
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फारच सरळमार्गी नेते आहेत”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर सोपवली ‘ही’ जबाबदारी, म्हणाले…
संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची गरज नव्हती, पण…- संजय राऊत
Comments are closed.