बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्राला तालावर नाचवणाऱ्या ‘शांताबाई’ फेम गायकाची राजकारणात एन्ट्री, ‘या’ पक्षात करणार प्रवेश!

मुंबई | दोन ते तीन वर्षांपुर्वी राज्यभर ‘शांताबाई’ गाण्याने धुमाकूळ घातला होता. या गाण्यावर तरूणाई बेभान होऊन थिरकली होती, त्यासोबतच त्या गाण्याचे बोल कानावर पडले तरी नकळत आपले हातपाय नाचू लागत होते. हे गाण प्रसिद्ध लोककलावंत गायक संजय लोंढे यांनी गायलं होतं.

गाण्यामुळे त्यांना कमी काळात मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. त्यानंतर संजय लोंढे प्रचंड प्रसिद्धीच्या झोक्यात आले होते. मात्र काही काळानंतर ती घटत गेली आणि क्षणातच गायब झाली. मात्र आता पुन्हा संजय लोंढे चर्चेत आले आहेत. एका हिट गाण्याच्या जोरावर त्यांनी प्रसिद्धी मिळवली होती अशातच लोंढे यांनी राजकारणात एन्ट्री केली आहे. येत्या 16 तारखेला मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संजय राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

संजय लोंढे हे एका गरीब कुटुंबात जन्मले होते त्याची परिस्थितीही फार काही चांगली नव्हती मात्र त्यांच्या शांताबाई गाण्याने लोकांना वेड लावलं होतं. मात्र घवघवतीत यशानंतरही त्यांची परिस्थिती हालाखीची आहे. लोेढेंनी आता राजकारणात प्रवेश करणार असून नवीन कलाकारांसाठी काम करण्याची त्यांची इच्छा आहे.

दरम्यान, सुरेखा पुणेेकरही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. सुरेखा पुणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या सहीत अजून 12 कलाकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. संजय लोंढे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या निर्णयामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

थोडक्यात बातम्या-

रणवीर-दीपिका झाले गुंठामंत्री! मुंबईमध्ये खरेदी केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची जमीन

”ही’ गोष्ट करून मोदींनी दाखवून दिलं, ‘मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही’”

“शेतकऱ्यांनी दिल्ली, हरियाणामध्ये आंदोलन करावं पंजाबला त्रास देऊ नये”

‘ …तर कोरोनाची लसही ठरु शकते निरुपयोगी’; WHOच्या माहितीनं जगाचं टेन्शन वाढलं!

राज्यभर गाजलेल्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंची अखेर ‘या’ जिल्ह्यात बदली!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More