पूजा चव्हाणची आजी म्हणणाऱ्या शांताबाईंचं पितळ उघडं, पूजाच्या वडिलांनी केला मोठा खुलासा
मुंबई | पू़जा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने संपुर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. या संपुर्ण प्रकरणात महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांचं नाव पुढे आलं आणि राजकीय नाट्याला सुरूवात झाली. पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी आपली कोेणीविरूद्ध तक्रार नसल्याचं स्पष्ट केलं होतं तसेच नुकतेच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कुटूंबाची आणि बंजारा समाजाची होत असलेली बदनामी थांबवण्यासाठी प्रयत्न करावे अशीही विनंती केली आहे.
पूजा चव्हाणची आजी शांताबाई चव्हाण या पुढे येऊन त्यांनी या प्रकरणात फिर्याद दाखल केली आहे. 20 दिवसांपासुन या प्रकरणात कोणीही पुढे आलं नव्हतं अचानक पूजाची आजी म्हणवुन घेणाऱ्या शांताबाई यांनी फिर्याद दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळं वळण प्राप्त झालं आहे.
दरम्यान पूजा चव्हाणचे वडील यांनी या संदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. शांताबाई या पूजाची आजी नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. आमच्या भावकीत कदाचित त्या असतील पण गेल्या 25 वर्षांपासुुन आमची आणि शांताबाईंची भेट नाही त्यामुळे असं कोणीही येऊन फिर्याद दाखल करेल, पोलिसांनी त्याची चौकशी करून मग पुढील कारवाई करायला पाहीजे असंही ते म्हणाले.
पूजा चव्हाणच्या मृत्युनंतर विरोधकांनी सत्ताधारी ठाकरे सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. पूजा चव्हाणच्या वडीलांनी केलेला खुलासा नुसार पूजाची तथाकथीत आजी शांताबाई यांनी या प्रकरणात अचानक का उडी घेतली असेल? हा प्रश्न उपस्थित होत आहे. पूजा चव्हाणचा बळी गेला. परंतू, या सर्व प्रकरणात राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेत असल्याचा आरोपही तिच्या वडीलांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
…अन् ‘या’ पत्रकाराने शेतकरी आंदोलनातच 12 लाखाच्या नोकरीचा दिला राजीनामा!
“आमचा कोणावरही आरोप नाही, संजय राठोड यांचा बळी घेऊ नका”
‘हिंमत असेल तर…’; अजित पवारांचं देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंज
‘बिग बी’ यांच्या प्रकृतीत बिघाड स्वत: पोस्ट करत दिली माहिती
सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी
Comments are closed.