Shantigiri Maharaj | राज्यात आज शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. याकडे अनेकांच्या नजरा आहेत. प्रत्येक मतदारसंघात काहीना काही मोठा ट्विस्ट घडताना दिसत आहे. काही ठिकाणी मतदान हे अगदीच धिम्या गतीने होताना दिसत आहे तर काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला आहे. अशातच आता नाशिकमध्ये एक मोठी धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक येथे शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) ईव्हीएम मशीनला हार घातल्याची घटना घडली आहे.
शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल :
सुरूवातीला बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकी दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी ईव्हीएमला हार घातला होता. त्यावेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता नाशिक लोकसभा मतदारसंघात तेच घडलं आहे. शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी ईव्हीएम मशीनला हार घातला असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आज नाशिक मतदारसंघातही तिहेरी लढत पाहायला मिळत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी हवी होती. मात्र नाशिकमध्ये मोठ्या राजकीय नाट्यानंतर नाशिकची जागा विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना देण्यात आली आहे. तर ठाकरे गटातून राजाभाऊ वाजे यांनी नाशिकमधून निवडणूक लढवली आहे. शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष निवडणूक लढवली. शांतिगिरी महाराजांना (Shantigiri Maharaj) हिंदूनी मतदान केलं तर हेमंत गोडसे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी मतदान करण्याआधी इव्हीएम मशीनच्या कक्षाला हार घातला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता निवडणूक आयोगाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यावर आता त्यांनी स्पष्टोक्ती दिली आहे.
शांतिगिरी महाराज यांची प्रतिक्रिया :
शांतिगिरी महाराज यांनी स्पष्टेक्ती दिली आहे. ते म्हणाले की, मी इव्हीएम मशीनच्या कक्षाला हार घातला नसल्याची माहिती त्यांनी दिली. मी ईव्हीएम मशीनच्या बाहेर असलेल्या भारत मातेच्या फोटोला हार घातला असल्याची माहिती समोर आली आहे. नियम तोडण्याचा माझा उद्देश नव्हता. निवडणुकांमध्ये दारू, पैसे वाटणाऱ्यांवर अजिबात गुन्हा दाखल करता येत नाही. आमच्याविरोधात हे कटकारस्थान असल्याचं शांतिगिरी महाराज म्हणाले आहेत.
म्हसरूळ पोलिसांनी जनेश्वर महाराजांना ताब्यात घेतले आहे. जनेश्वर महाराज हे शांतिगिरी महाराज यांचं साथीदार होते. ते मतदान केंद्रावर शांतिगिरी महाराजांच्या चिठ्ठ्या वाटण्याचं काम करताना दिसत होते. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
News title – Shantigiri Maharaj Again Case About Evm Machine
महत्त्वाच्या बातम्या
अभिनेत्री प्राजक्ता माळीने पहिल्यांदाच मुंबईमध्ये बजावला मतदानाचा अधिकार, म्हणाली…
“रात्री 11 वाजले तरीही चालेल पण मतदान करूनच जाणार,” जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात गोंधळ
रात्री झोपण्यापूर्वी दूध पित असाल तर आत्ताच बंद करा; होऊ शकतात गंभीर आजार
शेतकऱ्यांच्या पोटात आनंद मावेना, मान्सूनसंदर्भात मोठी अपडेट समोर