Top News देश

“शरद बोबडे सरन्यायाधीशच नाहीत, साक्षात शेतकऱ्यांसाठी भगवान”

नवी दिल्ली | आंदोलन आणि नविन कृषी कायद्याप्रकरणी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार फटकारलं. त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आंनदाचं वातावारण पाहयला मिळतं आहे.

याच पार्श्वभूमीवर न्यायालयात सुनावणी सुरु असताना सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी स्थगितीचा निर्णय देताच आंदोलक शेतकऱ्यांचे वकील एमएल शर्मा यांनी बोबडेंना साक्षात भगवान असल्याची उपमा देऊन टाकली.

कृषी कायद्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी माजी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्याचे सूतोवाचही सर्वोच्च न्यायालयाने केलं होतं. त्यानंतर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं वास्तव जाणून घेण्यासाठी समितीची स्थापना करत असल्याचं म्हटलं.

या समितीमध्ये भारतीय किसान यूनियनचे जितेंद्र सिंह मान, डॉ. प्रमोद कुमार जोशी,  कृषि तज्ज्ञ अशोक गुलाटी  आणि अनिल शेतकरी यांचा समावेश होता.

थोडक्यात बातम्या-

नविन पॉलिसीवर व्हॉट्सअॅपने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण; नवीन पॉलिसी केवळ….

सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला मोठा धक्का!

“राऊतांनी उड्या मारु नयेत, आम्ही स्वयंभू आहोत आम्हाला ठाकरे सरकारची गरज नाही”

आशिष शेलार शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

व्हॉट्सअपला धक्क्यावर धक्के; पहिलं स्थानही गमावलं, हे अॅप बनलं नंबर वन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या