Sharad Koli | शिवसेना पक्षात उभी फूट झाली त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्यासह 40 आमदारांना सोबत घेत भाजपशी युती केली. त्यावेळी शरद कोळी (Sharad Koli) यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. ते आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. शरद कोळी (Sharad Koli) हे त्यांच्या भाषणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. मात्र आता त्याच शरद कोळी (Sharad Koli) यांना एक धमकी आली असल्याची माहिती समोर आली आहे.
गुलाबराव पाटील यांच्याविरोधात एकदा शरद कोळी (Sharad Koli) यांनी भाषण केलं होतं. त्यांनी टीका देखील केली होती. त्यावेळी शरद कोळी यांना अटक केली जाणार होती मात्र ते एका अज्ञात स्थळी गेले. शरद कोळी यांनी शिंदे गटाच्या नेत्यावर केलेल्या टीकेमुळे ते अधिक प्रसिद्धीस आले. मात्र शरद कोळींनाच आता जीवे मारण्याची धकमी आली. ही धमकी आता नेमक्या कोणत्या कारणाने आली ते अद्याप समोर आलं नाही.
वाळूमाफियाकडून शिवसेनेचे उपनेते शरद कोळींना धमकी
सोलापूरच्या एका वाळूमाफियाकडून शिवसेनेचे उपनेते शरद कोळींना धमकी आली आहे. गोळ्या घालून मारेल अशी धमकी दिली आहे. आण्णाराव उर्फ पिंटू पाटील असं धमकी देणाऱ्याचं नाव आहे. याविरोधात आता सोलापूरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. शरद कोळी यांनी भीमा नदीच्या पात्रातील वाळूची तस्करी करणाऱ्यांना पकडले. त्याबाबत शरद कोळी यांनी दखल घेतली होती. यामुळे वाळूमाफियाने धमकी दिली होती.
त्याचबरोबर शिवसेना कार्यालय जाळून टाकण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी सोलापूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 351 अंतर्गत अदाखलपत्र गुन्हा दाखल केला होता.
आरोपीने नेमकी काय धमकी दिली?
शरद कोळी हे 6 जुलै रोजी संतोष पाटील यांच्यासोबत शिवसेना कार्यालयात बसले होते. याच वेळी अक्कलकोट येथील वाळू माफियांचा संतोष पाटील यांच्या मोबाईलवर फोन आला. त्यावेळी संतोष पाटीलच्या फोनवर शरद कोळी यांना धमकी दिली.
मागील वेळी लोकांना सोडून शरद कोळींच्या अंगावर गोळ्या घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यात सुदैवाने ते बचावले आहेत. मात्र यावेळी ते वाचणार नाहीत. जिथं दिसतील तिथं गोळ्या घालू, सोलापूर येथील त्यांचं कार्यालय जाळून टाकू”, अशी धमकी वाळू माफियांनी फोनवर बोलत असताना दिली असल्याची तक्रार शरद कोळींनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
News Title – Sharad Koli Solapur News Update Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
“खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत?”;जितेंद्र आव्हाडांचं ‘ते’ ट्वीट चर्चेत
मोठी बातमी! शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची मान्यता
कोट्यावधींचे 24 भव्य आश्रम, महागड्या गाड्या; भोलेबाबाची एकूण संपत्ती किती?
मोठी बातमी! ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी
..अन् अभिनेत्रीने थेट सलमान खानच्या कानाखाली लगावली; नेमकं असं काय घडलं होतं?