“आमच्या बाजूने निर्णय लागला नाही तर रस्त्यावर रक्तपात होईल”
चंद्रपूर | सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने निर्णय लागला नाही तर रस्त्यावर रक्तपात होईल असं धक्कादायक वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते शरद कोळी (Sharad Pawar) यांनी चंद्रपुरात केलं आहे.
चंद्रपूर येथे बोलत असतांना शरद कोळी यांनी केलेले वक्तव्य बघता नवा वाद उभा राहील अशी स्थिती आहे. थेट न्यायालयावर शरद कोळी यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे वाद उभा राहू शकतो. तर दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देखील आम्हालाच मिळावं, अशी मागणीही केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते शरद कोळी म्हणाले, आमचा आणि जनतेचा कायद्यावरील विश्वास उडाला आहे. कायदा मोदी-शाह, शिंदे-फडणवीस यांनी विकत घेतला आहे, अशी घणाघाती टीका केली आहे.
आमचा विश्वासघात झाला असून धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष आम्हालाच मिळाले पाहिजे सोबतच एकनाथ शिंदे यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे, असंही शरद कोळी (Sharad Pawar) यांनी मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.