“…तर शिवसैनिक तुम्हाला कुत्र्यासारखा फोडून काढतील”

पंढरपूर | ठाकरे गटाचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सडकून टीका केली आहे. खरंतर राणे कुटुंबीयांचं आगलावे आडनाव पाहिजे होतं, यांनीच अख्या महाराष्ट्रातील राजकारणात आग लावण्याचे काम केलं आहे अशी टीका त्यांनी राणेंवर केलीये.

खासदार संजय राऊत कधीच नीच आणि घाणेरडे राजकारण करत नाहीत असा विश्वास शरद कोळी यांनी व्यक्त केला आहे. ते पंढरपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

शेतकरी ज्या पद्धतीने शेतात सालगडी ठेवतात त्या पद्धतीने भाजपने नितेश राणेला राजकारण खराब करण्यासाठी सालगडी म्हणून ठेवले असल्याचा घणाघातही त्यांच्यावर केला आहे.

शरद कोळी यांनी नितेश राणे आणि नारायण राणे यांचा राजकीय बाप कोण असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत असं सांगत नितेश राणे, नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे साहेबांना अडवण्याचा प्रयत्न केला तर बारसुतील जनता आणि शिवसैनिक कुत्र्यासारखा फोडून काढतील असा इशारा शरद कोळी यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-