बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून मी ललित मोदींचं कौतुक केलं, बाकी काही नाही”

पुणे | राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू चंदू बोर्डे यांचा सत्कार झाला. एजल फेडरल लाईफ इन्श्युरन्स कंपनीद्वारे पुण्यात कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी शरद पवार यांनी क्रिकेट क्षेत्रातील अनेक गोष्टींना उजाळा दिला. यावेळी शरद पवार यांनी आयपीएलबाबत ललित मोदी यांचं कौतुक केलं आहे.

देशात आयपीएल सुरू करण्यात ललित मोदींचा महत्वाचा हातभार आहे. आयपीएल सुरू करण्यासाठी त्यांनी खुप कष्ट घेतलं आहे. भारताने जगाला दिलेला एक देखणा आणि आपण सुरू केलेला खेळ आहे. त्यामुळे क्रिकेटचं सगळं अर्थकारणच बदलून गेलं आहे. जगातील उत्तम खेळाडू आपल्या इथं खेळण्यासाठी येऊ लागले. यातून नव्या पिढीला त्यांच्याबरोबर खेळण्याची संधी मिळाली, असं शरद पवार म्हणाले.

ललित मोदींवर बीसीसीआयचं कोट्यवधी रूपयांचं नुकसान केल्याचा ठपका आहे. त्यांच्यावर आयपीएलमध्ये मनमानीपणे कार्यभार केल्याचा आरोप आहे. सध्या बीसीसीआयने ललित मोदींवर आजीवर बंदी घातली आहे. मी ललित मोदींच कौतुक केलं. कारण आयपीएल सुरू करण्यात त्यांचं महत्वाचं योगदान आहे. बाकी काही नाही, असं शरद पवार यांनी कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिलं.

दरम्यान, आयपीएलचा 14 हंगाम सध्या युएईमध्ये चालू आहे. कोरोना महामारीमुळे मे मध्ये सुरू झालेली आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! पाकड्यांनी भारतात पाठवलेत अफगाण दहशतवादी???; ‘या’ भागांवर हल्ला होण्याची शक्यता!

“अनिल देशमुख ईडीला येडं समजतात, राज्याचा ‘झू’ करून टाकलाय”

पंतप्रधान, मुख्यमंत्री सगळे नंतर पुढचा जन्म रस्ते काॅन्ट्रॅक्टरचा मिळू दे- हेमंत ढोमे

ठेच लागता पायी, वेदना होई तिच्या ह्रदयी! लेकराला मृत्यूच्या दारातून आणलं परत, पाहा व्हिडीओ

”अनंत गीतेंची जी अवस्था आहे तिच शिवसैनिकांची आहे, त्यांना कोणी विचारत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More