Top News क्राईम पुणे महाराष्ट्र

15 दिवसांपूर्वी तुरुंगाबाहेर आलेल्या कुख्यात गुंड शरद मोहोळला पुन्हा अटक!

पुणे | कुख्यात गुंड शरद मोहोळल पुन्हा अटक करण्यात आली आहे. मोहोळ अवघ्या 15 दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता. शरद मोहोळ हा कातिल सिद्दीकीच्या हत्या प्रकरणातील आरोपी आहे.

15 दिवसांपूर्वीच मोहोळची कातिल सिद्दिकीच्या हत्या प्रकरणातून मुक्तता झाली. मात्र आता पुन्हा शरद मोहोळला अटक करण्यात आलीये. 26 जानेवारील शरद मोहोळने हजेरी लावलेल्या कार्यक्रमात गोंधळ केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

शरद मोहोळ 26 जानेवारीला ज्या कार्यक्रमाला हजर राहिला होता त्यावरुन खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहोळ याच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गुंड गजानन मारणेची सोमवारी तळोजा कारागृहातून मुक्तता झाली. त्यानंतर त्याची पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जवळपास तीनशे ते पाचशे चारचाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक निघाली. यावेळी मारणेचे साथीदार द्रुतगती महामार्गावर थांबून आरडाओरडा करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते. या धांगडधिंगा प्रकरणात पोलिसांनी गजा मारणेला अटक केली आहे.

थोडक्यात बातम्या-

आज ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे भाव…

तहानलेल्या सापाला वनाधिकाऱ्याने बाटलीने पाजलं पाणी, पाहा व्हिडिओ

फास्ट-टॅगवरून मनसे नेत्या रूपाली ठोंबरेंचा टोल नाक्यावर राडा, व्हिडीओ व्हायरल!

…म्हणून महाराष्ट्रात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं- आशिष शेलार

शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाणार असाल तर सावधान!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या