बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवारांच्या सीबीआय चौकशीवरून शरद पवारांची पाटलांवर टीका; म्हणाले…

पुणे | भाजपच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौैकशी करण्याची मागणी करणारा प्रस्ताव मंजुर करण्यात आला होता. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर आपली प्रतिकिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.  पुण्यामध्ये नुकत्याच उद्घाटन करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील हे मोठे कर्तृत्वान गृहस्थ आहेत. यापूर्वी कधी झाल्या नाहीत त्या गोष्टी करण्यात त्यांचा लौकीक आहे त्यांनी पुढाकार घेऊन असं काही केलं तर आश्चर्य नाही. चौकशी यंत्रणा त्यांच्या हातात आहेत, त्यांचं स्वागत आमचे सर्व सहकारी करतील, असं म्हणत शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली.

ईडी वगैरे आम्हाला काही नवीन नाहीत. अनिल देशमुख काही पहिले नाहीत. अनेकदा सत्तेचा या पद्धतीने वापर करण्याचा पायंडा आत्ताच्या राज्यकर्त्यांनी दाखवला आहे. त्याची आम्हाला यत्किंचितही चिंता वाटत नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर याआधीही केंद्र सरकारच्या काही यंत्रणांनी कारवाई केली होती. पण त्यातून त्यांना काय हाती लागलं हे मला माहिती नाही. माझ्यामते काहीही हाती लागलं नाही. त्या नैराश्यातूनच अजून कुठून त्रास देता येईल का?, या विचारातून हा त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. त्याची चिंता करण्याचं आम्हाला काही कारण नाही, असंही शरद पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“देशमुखांवरील कारवाई न्यायालयाच्या निर्देशानुसार, संजय राऊत राष्ट्रवादीची सुपारी वाजवत आहेत”

ट्विटरचा झटका! केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक

‘बिग बाॅस 14’ विजेती रुबिना दिलैक शोमध्ये परिधान केलेल्या गाऊनचा करणार लिलाव

अनिल देशमुखांना बार मालकांनी दिले तीन महिने 4 कोटी रूपये; ईडीचा धक्कादायक खुलासा

….म्हणून अभिनेत्री पायल रोहतगीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More