महाराष्ट्र सोलापूर

राज्यपालांना वेळ भेटेना, मात्र ‘त्या’ शेतकरी पुत्रांचे गाऱ्हाणे ऐकले शरद पवारांनी

पंढरपूर | केंद्र सरकारकडून करण्यात आलेली कांदा निर्यात बंदी तर दुसरीकडे खराब हवामानामुळे अडचणीत सापडलेला कांदा उत्पादक शेतकरी यासंदर्भात आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी शेतकरी पुत्रांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. मात्र सिनेकलावंत, राजकीय नेत्यांची भेट घेणाऱ्या राज्यपालांनी दखलही घेतली नाही. मात्र, माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी या युवा शेतकऱ्यांना वेळ देत त्यांचे गाऱ्हाणे एकूण घेतले आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मुले असणारे बार्शी तालुक्यातील विरेश आंधळकर, पंकज चिवटे व निखिल सातपुते यांनी आज पंढरपूर येथे खा शरद पवार यांची भेट घेत कांदा उत्पादकांच्या अडचणी मांडल्या, यावेळी पवार यांनी सविस्तरपणे एकूण घेत सरकार दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी, नैसर्गिक संकट, केंद्र सरकारकडून करण्यात आलेली कांदा निर्यात बंदी यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांची मुले म्हणून आम्ही यासंदर्भात शासन दरबारी आवाज उठवण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला यश येताना दिसत आहे. आज माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची पंढरपूर येथे भेट घेऊन निवेदन देत सविस्तर चर्चा झाली. साहेबांनी देखील दखल घेत पुढील कार्यवाही करण्याचं आश्वासन दिले असल्याचं विरेश आंधळकर यांनी सांगितले.

दरम्यान, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या शेतकरी पुत्रांना भेटीसाठी वेळ देण्याची विनंती केली होती. रोहित यांनी ट्विटकरत ‘महामहीम राज्यपाल महोदय हे नागरिकांच्या हक्कांप्रति अत्यंत संवेदनशील आहेत. आजवर त्यांनी कलाकार,विरोधी पक्षाचे नेते यांचं म्हणणं ऐकून सरकारला योग्य ते निर्देश दिलेत. आपण अन्नदाता व पत्रकार असल्याने राज्यपाल महोदय आपल्यालाही निश्चित वेळ देऊन आपली समस्या जाणून घेतील, असा विश्वास असल्याचं म्हंटल होतं.

महत्वाच्या बातम्या-

“चंद्रकांत पाटील म्हणतात पहाटे पुन्हा भूकंप होणार, त्यांनी गजर लावलाय का?”

‘तू माझ्या मुलीसारखी, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल’; भगतसिंह कोश्यारींचं पायल घोषला आश्वासन

मला, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना नोटीस आल्या आहेत, त्याला आम्ही उत्तर देऊ- सुप्रिया सुळे

“मनसेचं सरकार आल्यावर व्याजासकट हिशोब चुकता करू”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या