Loading...

आपलाच पक्ष अडचणीत असल्यानं या पक्षाच्या मेळाव्याला शरद पवारांची अनुपस्थिती!

पुणे | पुण्यातल्या बामसेफ बहुजन मुक्ती पार्टी कार्यकर्ता मेळाव्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पाठ फिरवली आहे. सातत्याने वादग्रस्त ठरणाऱ्या वामन मेश्राम यांनी हा मेळावा आयोजित केला होता.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि वामन मेश्राम हे आज (शनिवार) एकाच मंचावर येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. पवार या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावणार होते. तसे हजारो बॅनरही पुण्यात लागले होते.

Loading...

गेली 40 वर्ष बामसेफच्या माध्यमातून मेश्राम कार्यरत आहेत. 400 हून अधिक जिल्ह्यात  त्यांचा प्रभाव आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार राज्यात त्यांना चांगला जनाधार आहे.

दरम्यान,  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी या मेळाव्याला उद्घाटक म्हणून उपस्थित होते. त्यावेळी बोलताना, पेशवाईची गिधाडं देशावर आणि राज्यावर झडप घालण्यासाठी आकाशात घिरट्या घालत आहेत, देशातली सध्याची परिस्थिती पाहता सगळ्यांनी एकमेकांना साथ देणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

मुलाच्या भाजपप्रवेशाचं मधुकर पिचड यांच्याकडून समर्थन; म्हणतात…

-भाजपात प्रवेश करताना पिचड म्हणतात, मी पवारांचे उपकार कधीही फेडू शकत नाही!

-…म्हणून भाजपने जोरात इनकमिंग चालवलंय- सुशीलकुमार शिंदे

Loading...

-“अडचणीचा काळ असला तर काय झालं, आम्ही साहेबांच्या सोबत आहोत”

-राजीनाम्याच्या निर्णयानंतर चित्रा वाघ सोशल मीडियावर ट्रोल!

Loading...