मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलं असून त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.
पित्ताशयाचा त्रास जास्त जाणवत असल्यामुळे बुधवारी 31 मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
शरद पवार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी जाणार होते. पण आता प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना दौरा रद्द करावा लागला आहे. नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. वैद्यकीय तपासणीनंतर सध्या कुठलीही औषधे न घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी पवार यांना दिल्याचं कळतंय.
दरम्यान, कालच शरद पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याची चर्चा आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर अशा अफवा उडवल्या जात आहेत. अशी कोणतीही बैठक अद्याप झालेली नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीने दिलं आहे.
NCP अध्यक्ष शरद पवार को पेट में तकलीफ के कारण चेक-अप के लिए अस्पताल ले जाया गया। उन्हें गॉल ब्लैडर में तकलीफ है। जिसका ऑपरेशन करना ज़रूरी है। 31 तारीख को उन्हें अस्पताल में भर्ती कराया जाएगा, उनकी सर्जरी होगी। तब तक के लिए उनके सारे कार्यक्रम स्थगित किए गए हैं: नवाब मलिक, NCP pic.twitter.com/O4oxvYqQZz
— ANI_HindiNews (@AHindinews) March 29, 2021
थोडक्यात बातम्या-
पवार- शहा भेटीच्या चर्चेवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
महावितरणची थकबाकी हे भाजपचंच पाप आहे- नितीन राऊत
मोदींनी आदेश दिल्यास माझी ममतांच्या विरोधातही लढायची तयारी – मिथुन चक्रवर्ती
माजी IPS संजीव भट्ट यांच्या पत्नीची भावनिक साद, म्हणाल्या…
‘तुझ्या बॅटमध्ये स्प्रिंग आहेत का?’; षटकार मारल्यावर स्टोक्सनं शार्दुलची बॅट तपासली
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.