शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल यांना झापलं, म्हणाले…

Sharad Pawar | राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घटना घडताना दिसत आहेत. अशातच आता अजित पवार गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप परिधान केला होता तेव्हापासून राज्यात शिवप्रेमींनी तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रफुल पटेल यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. मात्र त्यामध्ये त्यांनी ना दिलगिरी ना माफी मागितली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रफुल पटेल यांना खडेबोल सुनावलं आहे.

प्रफुल पटेल यांनी मोदींना जिरेटोप घातल्याचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाला. त्यामुळे राज्यात शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर नाना पटोले यांनी देखील प्रफुल पटेल यांना धारेवर धरलं होतं. आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रफुल पटेल यांची लाचारी काढली आहे. त्यांनी प्रफुल पटेल यांना सुनावलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रफुल पटेल यांना जिरेटोप प्रकरणी सुनावलं ते म्हणाले की, जिरेटोप आणि महाराष्ट्राचा इतिहास राहिलेला आहे. तो जिरोटोप छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ओळखला जातो. लाचारी असते, नाही असं नाही. पण लाचारीच्या सर्व मर्यादा या लोकांनी सोडल्या आहेत, अशा शब्दात शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रफुल पटेल यांना फटकारलं आहे.

जिरेटोपवरून प्रफुल्ल पटेल यांची पोस्ट

जिरेटोपवरून प्रफुल पटेल यांनी त्यांच्या सोशल मीडियावर “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ,” अशी पोस्ट केली आहे.

PateLComment

पटेल यांच्या या कृतीने संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संतापले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे इतर कोणीही जिरेटोप परिधान करू शकत नाहीत. पंतप्रधान हे छत्रपती नाहीत. त्यांनी जिरेटोपाचा अवमान करू नये, असं संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अधिक मीठ खाणं जीवघेणं ठरतंय, जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा

हिरामंडीमधील ओरल सेक्सच्या सीनबाबत शेखर सुमनचा खुलासा!

“…तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार?”; बड्या नेत्याने थेट फार्म्युलाच सांगितला

“राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान काय?”

बारावीच्या निकालाबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर!