बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपामध्ये घेतलं शरद पवारांचं नाव; म्हणाले…

मुंबई | सचिन वाझे प्रकरणात अडचणीत आलेले माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवर धक्कादायक आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना महिन्याला 100 कोटी जमा करायला लावले असल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. पत्रामध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचंही नाव घेतलं आहे.

मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथं अँटीलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्यावेळेसच मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातलं. एवढच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार तसच शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली. तिथं उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना खरं तर ही माहिती आधीच होती असं माझ्या लक्षात आलं असल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रातून केला आहे.

अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्टॉरंट आणि अन्य आस्थापनांमधून 100 कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी पत्रातून केला असल्याची माहिती समजत आहे. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर मोठी खळबळ माजली असूून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, माजी आयुक्तांनी केलेल्या आरोपावरून सध्या राजकीय वातावरण पेटलं आहे. विरोधी पक्षाने सिंह यांनी केलेल्या आरोपावरून राज्य सरकारला धारेवर धरलं असून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘अनिल देशमुखांनी वाझेंना महिन्याला 100 कोटी जमा करायला लावले होते’; माजी मुंबई पोलीस आयुक्तांचा गंभीर आरोप

लाँच झालेल्या मेड इन इंडिया काॅम्पॅक्ट एसयूव्ही Skoda Kushaqचे जाणून घ्या फिचर्स

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण

‘ती खरंच गरीब आहे का?’; सायली कांबळेला गरीब दाखवल्याने ‘इंडियन आयडल 12’ वादाच्या भोवऱ्यात

धक्कादायक! नवरा रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघत असल्यामुळे नाराज होऊन बायकोने….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More