राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा मोठा समझोता!

मुंबई | पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. दोन्ही गटांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचं चिन्ह घड्याळ वाचणार आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी घड्याळ चिन्ह वाचवण्यासाठी एकप्रकारे समझोता केल्याचं मानलं जात आहे. (Sharad Pawar Ajit Pawar)

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पाच राज्यांच्या निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची लढाई निवडणूक आयोगात सुरू असताना हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच अजित पवारगटाच्या वर्किंग कमिटीची बैठक दिल्लीत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत निवडणूक आयोगात सुरू असलेल्या लढाईसंदर्भात चर्चा होणार असल्याचं कळतंय.

दरम्यान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोरम या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या राज्यांमध्ये राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. मात्र निवडणूक लढवली असतील तर एखाद्या दोन जागा राष्ट्रवादीला सहज निवडून आणता आल्या असल्या.

राष्ट्रवादीच्या कुठल्याही गटाने निवडणूक लढवणं दोन्ही राष्ट्रवादींना परवडणारं नव्हतं, कारण एका गटाने जरी या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असता तर कायदेशीर पेच निर्माण झाला असता. प्रसंगी चिन्ह गोठवण्याची शक्यताही निर्माण झाली असती. त्यामुळे दोन्ही गटांनीही या निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 9 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीच्या चिन्हाची पुढची सुनावणी होणार आहे, त्यामुळे तूर्तास दोन्ही गटांनी समझोता केला असला तरी भविष्यात हे चिन्ह कोणाचं याबाबत मात्र निर्णय होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘ती’ एक चूक अन् ललित पाटील पोलिसांच्या जाळ्यात फसला!

‘त्या 2 नेत्यांची नार्को टेस्ट करा’; सुषमा अंधारेंचा धक्कादायक आरोप

ललित पाटीलच्या कुटुंबाचा अत्यंत गंभीर आरोप

‘मी पळालो नाही, मला पळवलं गेलं’; ललित पाटीलचा मोठा खुलासा

ड्रग माफिया ललित पाटीलचा खळबळजनक गौप्यस्फोट!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .