महाराष्ट्र मुंबई

पूरग्रस्तांसाठी शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पूरग्रस्तांना जाहीर केलेल्या मदतीमध्ये सरकारने वाढ करावी, अशी प्रमुख मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना मागण्याचं निवेदन दिलं. पूरग्रस्तांच्या व्यथा आणि अडचणी त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.

पूरग्रस्त भागातील बाधीत जनतेच्या मागण्यांकडे राज्यसरकारचे लक्ष वेधले. त्यास अनुसरून राज्यसरकारने काल मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काही धोरणात्मक निर्णय घेतल्याचे दिसून येते, अशी माहिती पवार यांनी दिली.

ज्याचे प्रमुख म्हणून संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आम्ही मांडलेल्या समस्या व सादर केलेल्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करून, निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी मुख्यमंत्री तातडीने उपाययोजना कराव्या अशी आम्ही अपेक्षा करतो, असं पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-भीक नको म्हणणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंना विनोद तावडे यांचं प्रत्युत्तर…!

-पी. चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

-सरकार आपल्या डोक्यावर मिरच्या वाटतंय- खासदार अमोल कोल्हे

-दानवेंच्या होम ग्राऊंडवर धनंजय मुंडेंची तोफ धडाडली; म्हणतात हे तर ‘खाऊसाहेब दानवे…!’

-शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर छगन भुजबळ म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या