…मग सामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी?; पार्थच्या उमेदवारीला शरद पवारांचा विरोध

मुंबई | पार्थ पवार यांच्या उमेदवारीला त्यांचे आजोबा आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट विरोध केला आहे. पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर सामान्य कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार? असा सवाल शरद पवार यांनी विचारला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमध्ये दोन दिवसीय बैठक सुरु आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल चर्चा होत आहे. 

काँग्रेसकडील कोणत्या जागांवर दावा सांगायचा आणि त्या जागा कशा जिंकायच्या? याचा राष्ट्रवादीकडून आढावा घेतला जात आहे. यावेळी पार्थच्या उमेदवारीला शरद पवारांनी विरोध केल्याचं कळतंय. 

दरम्यान, शरद पवार यांच्या विरोधावर अजित पवार यांनी मौन बाळगलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-भारतापुढे विंडीज सपशेल फेल; भारतानं फॉलोऑन लादला

-एकनाथ खडसेंना यावेळी तरी मंत्रिपद मिळणार का?

-मंत्रिमंडळातून कुणाला मिळणार डच्चू अन् कुणाचा होणार समावेश?

-बलात्कारामुळे गुजराती संतापले; परप्रांतियांवर हिंसक हल्ले सुरु

-50 हजारांचा पोपट चोरीला; व्हॉट्सअॅमुळे अवघ्या 48 तासात सापडला

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या