शरद पवार खोटारडे; त्यांच्याशी आपले कधीच संबंध नव्हते!

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पलटवार केला आहे. पवारांनी केलेला दावा आंबेडकरांनी फेटाळून लावला आहे.

प्रकाश आंबेडकर आपल्यामुळेच खासदार झाले होते, असं विधान शरद पवारांनी केलं होतं. त्यावर बोलताना आंबेडकर म्हणाले, 1997-98 साली काँग्रेस समवेत समझोता झाला. तो तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांच्याबरोबर झाला होता. त्यामध्ये शरद पवारांचा कुठेही सहभाग नव्हता, शरद पवार यांच्याशी आपले कधीच संबंध नव्हते. हा आपला अंतिम खुलासा आहे. यापुढे पवार काही बोलले तरी मी खुलासा करण्याच्या फंदात पडणार नाही.

दरम्यान, त्यांनी भाजप सरकारवरही राफेल घोटळ्यावरून जोरदार टीका केली.

महत्त्वाच्या बातम्या-

– राम कदमांसह ‘या’ दोन नेत्यांना भाजप कार्यालय बंदी?

साताऱ्यातील निवडणुकीची बारामतीतून मोर्चेबांधणी; पवारांच्या घरी आमदारांची बैठक

-मोदींचं भाषण सुरू असताना खासदार स्टेजवरच ढाराढूर झोपले; पाहा व्हिडिओ

– मोदींचं भाषण सुरू असताना खासदार स्टेजवरच ढाराढूर झोपले; पाहा व्हिडिओ

-भाजपला मोठा धक्का; ‘या’ महिला नेत्याचा भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या