शरद पवार आणि राज ठाकरेंचा एकाच विमानातून प्रवास; आघाडीसाठी खलबतं?

शरद पवार आणि राज ठाकरेंचा एकाच विमानातून प्रवास; आघाडीसाठी खलबतं?

औरंगाबाद | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी एकाच विमानातून प्रवास केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राज ठाकरे आपला विदर्भ दौरा आटोपून औरंगाबादला आले होते. तिथून ते मुंबईला जाणार होते. मात्र या विमानातून शरद पवारही मुंबईला जाणार होते. त्यामुळे शरद पवार आणि राज ठाकरेंनी सोबतच विमानातून मुंबई पर्यंतचा प्रवास केला, त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.

आगामी निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी विरोधकांना एकत्र घेऊन महाआघाडी केली जात आहे. मात्र या महाआघाडीत मनसेला घेण्यासाठी काँग्रेसचा विरोध आहे. तर राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. त्यामुळे ठाकरे आणि पवारांचा हा सोबतच्या प्रवासात नेमकी काय चर्चा झाली ते अद्याप उघड झालेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

-राहुल गांधी म्हणाले, चौकीदार… लोक म्हणाले, चोर है… पाहा व्हिडिओ

-उत्तर भारतीयाला मारहाण करणाऱ्या तीन शिवसैनिकांना अटक!

-अयोध्येत राम मंदिराएेवजी मशिद बांधा; भाजप नेत्याची मागणी!

-स्मृती इराणींनी टाकलेल्या फोटोची सोशल मीडियावर एकच चर्चा!

-हिंदू धर्म आवडत नाही; इस्लाम स्वीकारण्यासाठी मुंबईचा तरुण पळून गेला

Google+ Linkedin