बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आमच्या शेतकऱ्यांचा…’; लखीमपूरच्या ‘त्या’ घटनेवर शरद पवार संतापले!

मुंबई | केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षभरापासून राजधानी दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे. केंद्रातील मोदी सरकारही या आंदोलनाबाबत काही पाऊल उचलताना दिसत नाही. मात्र रविवारी मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहेे. देशभरातून यावर संताप व्यक्त केला जात आहे. अशातच यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा हिंसक प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी येथील घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो, अशा शब्दात शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी टीका केली आहे.

लखीमपूर हिंसाचारात एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर, मृत्युमुखी पडलेले इतर चार जण हे भाजप कार्यकर्ते असल्याचं समोर आलंय. याशिवाय एका स्थानिक पत्रकाराचा देखील या घटनेत मृत्यू झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी येथे झालेल्या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या भेटीला निघालेल्या काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

हातात झाडू घेऊन गेस्ट हाऊसची साफसफाई करताना दिसल्या प्रियांका गांधी, पाहा व्हिडीओ

‘जर पोलिसांनी प्रियांका गांधींना सोडलं नाही तर…’; नाना पटोले आक्रमक

शिवलीला पाटीलने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; चाहत्यांना मोठा धक्का

‘हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके जायेंगे’; खडसेंचा भाजपला इशारा

भारतातील लसीकरणाविषयी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More