अजित पवारांवर शरद पवार नाराज?, अजित पवारांनी सोडलं मौन

मुंबई | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे(NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी अधिवेशनाच्या सभागृहात असंसदीय शब्द वापरला म्हणून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. यावरून आता विविध चर्चांणा उधाण आलं आहे.

पाटलांच्या निलंबनावर अजित पवार(Ajit Pawar) यांनी संयमाची भूमिका दाखवली. परंतु अजित पवारांच्या या भूमिकेवर शरद पवार(Sharad Pawar) नाराज असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

शदर पवार नाराज असेल्याच्या चर्चांवर नुकतीच अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, शरद पवार नाराज आहेत हे खोटं आहे. ते नाराज आहेत हे तुम्हाला कोणी सांगतिलं, शरद पवारांनी फोन करून सांगितलं का?, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पत्रकारांना विचारण्याचा अधिकार आहे. मी रोज साहेबांच्या संपर्कात असतो, मग तुम्हाला हे कोणी सांगितलं असं म्हणत त्यांनी या अफवांबद्दल पत्रकारांनाही चांगलंच सुनावलं.

मी विरोधी पक्षनेता आहे, मला माझ काम कळतंय. मी गेल्या 32 वर्षांपासून राजकारण, समाजकारण करणार व्यक्ती आहे. त्यामुळं माझी काळजी करू नका, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, शरद पवार अजित पवारांवर नाराज असलेच्या चर्चांणा आता पूर्ण विराम मिळाल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More