बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मला कुणाच्या परवानगीची गरज नाही; राष्ट्रीय वारकरी परिषदेला पवारांचं उत्तर

पुणे | मला कुणाच्या परवानगीची गरज लागत नाही. मला पसंत असलेल्या रस्त्याने मी जाईन. माझ्या रस्त्याशी मी तडजोड करणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेला उत्तर दिलं आहे.

जोग महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी शरद पवार आळंदीत आले होते. यावेळी शरद पवारांनी राष्ट्रीय वारकरी परिषदने केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

पंढरपूरला मी नेहमी जात असतो, प्रसिद्धी करत नाही. पहाटे लवकर जाऊन विठ्ठलदर्शन घेत असतो. राजकारणात आम्ही आहोत म्हणजे अखंडपणे प्रसिद्धीशिवाय आम्हाला काही दिसत नाही असा गैरसमज आहे. पण त्या गैरसमजाकडे मी जात नाही आणि जाऊ इच्छित नाही, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

दरम्यान, शरद पवार हे देवाला मानत नाही. त्यांनी समर्थ रामदास यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे पवारांना धार्मिक कार्यक्रमांना बोलवू नका, असं राष्ट्रीय वारकरी परिषदेनं म्हटलं होतं.

ट्रेंडिंग बातम्या- 

संभाजी भिडे यांच्याविरोधात अटक वाॅरंट जारी

शेतकरी कर्जमाफीच्या हिशोबात बँकाकडून गडबडी?

महत्वाच्या बातम्या- 

महामोर्चाआधी मनसेला गुड न्युज; या दोन नेत्यांनी केला ‘मनसे’ प्रवेश!

“मी महाराष्ट्राची मुलगी; घाबरणार नाही, गप्प बसणार नाही”

ठाकरे सरकारच्या कर्जमाफीचा फायदा गावातील 5 लोकांनाही मिळत नाही- राजू शेट्टी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More