महाराष्ट्र मुंबई

सुधारणांवरुन वाद नको, पण व्यवस्था कमकुवत होऊ नये- शरद पवार

मुंबई | कृषी कायदे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सरकारनं आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. याबैठकीत शरद पवार यांनी कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारला सल्ले दिलेत.

धान्य, डाळी, कांदा, बटाटा आणि तेलबिया यावरील साठवणुकीची मर्यादा उठवल्यास काळाबाजार होण्याची शक्यता आहे. कॉर्पोरेट कंपन्या हा सर्व माल शेतकऱ्यांकडून कमी भावात खरेदी करतील. त्यानंतर दीर्घकाळ त्याची साठवणूक करुन ठेवतील. त्यामुळे या मालाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे

अत्यावश्यक वस्तू कायद्यातील सुधारणेविषयी मला चिंता वाटत असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. त्यांनी यासंदर्भात काही ट्विट केले आहेत.

या सुधारणेनुसार एखाद्या बागायती पिकाची किंमत 100 टक्क्यांनी वाढली किंवा नाशिवंत मालाची किंमत 50 टक्क्याहून अधिक वाढली तर सरकारला त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार मिळेल. ही बाब चिंतेची असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

 

थोडक्यात बातम्या-

शिवसेना सगळं बटण दाबून करते- नारायण राणे

धक्कादायक…! सुशांतसिंग राजपूतच्या भावाला भर चौकात गोळ्या घातल्या!

शेतकऱ्यांनो, मी तुमच्यापासून फक्त एक कॉल दूर- नरेंद्र मोदी

संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या तयारीत!

‘मी आता त्यांच्यापुढे डोकं फोडून घेऊ का?’; अजित पवार भडकले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या