“भाजप गरज संपल्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत..”; शरद पवारांनी दिली धोक्याची घंटा

Sharad Pawar | राज्यात आज 20 मे रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. अशात शरद पवार यांनी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यावर निशाणा साधत मोठा दावा केला आहे. त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

काही दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल मोठं विधान केलं होतं. एका मुलाखतीत जेपी नड्डा यांनी भाजपला आता संघाची गरज नसल्याचं वक्तव्य केलं. यावरून शरद पवार यांनी भाजपला टार्गेट केलं आहे.

“भाजपला यांची गरज संपेल तेव्हा ते..”

संघ या विचारानं स्ट्राँग असणाऱ्या संस्थेबाबत भाजपचे वरिष्ठ नेते जर गरज संपली असं म्हणत असतील तर भविष्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांना धोक्याची घंटा आहे. ज्या दिवशी भाजपला त्यांची गरज संपेल त्या दिवशी संघाबाबत त्यांनी जो अप्रोच घेतला तसाच अप्रोच राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं स्पष्टपणे शरद पवार (Sharad Pawar ) म्हणाले आहेत.

राजकीय वर्तुळात आता शरद पवारांचं हे विधान चर्चेत आलं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला. “मोदी मला भटकती आत्मा म्हणाले. मुळात त्यांनी राज्यामधील महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला पाहिजे परंतु त्यांनी लोकांची निराशा करण्याचं काम केलं. मला भटकती आत्मा म्हणणं, राहुल गांधींना शहाजहा म्हणणं हे काही निवडणुकीचे प्रश्न नाहीत.”, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

“मोदींनी लोकांची निराशा केली”

तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणावरही पवारांनी भाष्य केलं. इंडिया आघाडीची संख्या 28 पक्षांची आहे. त्यातील 15 पक्ष असे आहेत ज्यांचे लोकसभेत एक सदस्य आहेत. जिथं विचारधारा एक आहे तिथं वेगळा निर्णय कशाला घ्यायचा. म्हणून काँग्रेसमध्ये विलीनीकरण संदर्भात चर्चा झाली. असं शरद पवारांनी (Sharad Pawar ) सांगितलं.

दरम्यान, शरद पवारांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत जो दावा केलाय, त्यावर महायुतीकडून काय प्रतिक्रिया येणार, ते पाहावं लागणार आहे. जेपी नड्डा यांच्या संघाबाबतच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीकडून भाजपाला टार्गेट केलं जातंय.

News Title –  Sharad Pawar big claim about ncp and shivsena

महत्त्वाच्या बातम्या-

“जिच्यामुळे वाद झाले, तिला तिसराच..”; सलमान-विवेकच्या भांडणावर सलीम खान यांनी सोडलं मौन

MS धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! धोनी अजून एक वर्ष..

एमएस धोनीच्या आयपीएल निवृत्ती संदर्भात मोठी अपडेट; जाणून घ्या धोनी CSK ला कधी निरोप देणार?

दुःखद घटना; राष्ट्राध्यक्षांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन

फोर्ड कंपनी बाजारात धुमाकूळ घालणार; नवीन SUV कारची एंट्री