“कुणी जात असेल तर थांबवण्याचा प्रश्न उद्भवत नाही”
मुंबई | शरद पवार (Sharad pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. पण अजित पवार (Ajit Pawar) यावेळी उपस्थित नव्हते.
पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शरद पवार यांनी अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी इथे कोण उपस्थित आहे किंवा नाही यावरुन वेगळा अर्थ काढू नका, असं उत्तर दिलं.
अजित पवार राष्ट्रवादीच्या 40 आमदारांसह भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. याबाबतच्या चर्चा वाढल्यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर सर्व दावे फेटाळले होते. यावर पुन्हा एकदा शरद पवारांनी भाष्य केलंय.
बात अशी आहे की, कुणाला जायचं असेल, मग तो कोणताही राजकीय पक्ष असो, कुणीही कुणाचा मोहताज नाही. त्यामुळे थांबवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली तर संघटनेत आणखी बळ कसं येऊ शकतं याकडे लक्ष दिलं पाहिजे. तितकं मला समजतं. पण अशी बात आमच्या संघटनेत नाही, असं शरद पवार म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
- मोठी बातमी! सापळा रचून पोलिसांकडून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
- ‘खुटा हलवून जाम करण्याचा प्रकार’; सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका
- ‘शरद पवारांचा हा पावर गेम होता’; ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य
- पवारांचा राजीनामा नामंजूर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
- सर्वात मोठी बातमी! शरद पवारच पक्षाचे अध्यक्ष राहणार
Comments are closed.