Sharad Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांना सोबत घेत भाजपसोबत हातमिळवणी केली. मात्र अजित पवारांना लोकसभा निवडणुकीत म्हणावं असं यश प्राप्त झालं नाही. राज्यातून एकाच जागेवर अजित पवारांनी विजय मिळवला. यामुळे अजित पवारांचे आमदार हे नाराज आहेत. ते आता शरद पवार यांच्या पक्षात येणार असल्याची चर्चा आहे. यावर आता शरद पवारांना (Sharad Pawar) अजितदादांचे आमदार पुन्हा आले तर पक्षात घेणार का? असा सवाल केला होता. तेव्हा शरद पवारांनी सवाल पैदा नही होता असं उत्तर दिलं होतं. मात्र आता शरद पवारांनी (Sharad Pawar) गुगली टाकली आहे.
शरद पवारांची गुगली :
शरद पवार हे कधी भाकरी फिरवतील याचा काहीही नेम नाही. शरद पवार (Sharad Pawar) हे कधी कोणतं वक्तव्य करतील हे सांगता येत नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता अजित पवारांच्या आमदारांना आपल्या पक्षात घेण्यावरून मोठं वक्तव्य करत गुगली टाकली आहे.
माध्यमांसोबत बोलत असताना अजित दादांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी असं नाही, अशी माहिती शरद पवारांनी (Sharad Pawar) दिली. विधानसभा निवडणुकीत पक्ष नव्या युवा पिढींना संधी देणार असल्याचं शरद पवार म्हणाले. पक्षाकडे नवीन चेहरे प्रचारासाठी येत असून पक्षाने नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.
विधानसभा अजितदादांसाठी अवघड :
शरद पवारांना अजितदादांच्या आमदारांना पुन्हा आपल्या पक्षात स्थान देण्याबाबत सवाल केला होता. तेव्हा शरद पवारांनी ‘सवाल पैदा नही होता’, असं उत्तर शरद पवारांनी दिलं होतं. मात्र आता शरद पवारांनी गुगली टाकत उत्तर दिलं आहे. अजित पवारांच्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी नाही असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यांनी खऱ्या अर्थाने गुगली टाकली असल्याचं बोललं तरी वावगं ठरणार नाही. अजित पवारांसोबत जाणाऱ्या आमदारांची संख्या अधिक होती. मात्र टीका करणाऱ्या आमदारांची संख्या कमी होती, असं शरद पवार म्हणाले.
अजित पवारांना आगामी विधानसभा निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना विजयाचं खातं उघडता आलं. त्याचाच परिणाम हा विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळू शकतो. बारामती विधानसभा मतदारसंघातही युगेंद्र पवार हे गावोगावी जात भेटी देत आहेत. तर शरद पवार देखील दुष्काळ दौरे करत आहेत. यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही अवघड जागेचं दुखणं होऊन बसू शकते.
News Title – Sharad Pawar Big Statement About Ajit Pawar Mla Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
“…अन्यथा आम्ही विखेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही”
सरोगेट मातांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय!
‘या’ 7 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा; तुमचा कधीही पराभव होणार नाही
पिपाणी चिन्हावरून मतदारांमध्ये संभ्रम; शरद पवारांचं थेट निवडणूक आयोगाला पत्र