Sharad Pawar | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात अनेक बदल होताना दिसत आहेत. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटातील एक आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी टाकलेला हा पहिला डाव असल्याचं बोललं जातंय. (Sharad Pawar)
काही दिवसांआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. त्यानंतर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच त्यांनी नासक्या आंब्यावर सर्जिकल स्ट्राईकचा इशारा दिला आहे.
“नासक्या आंब्याला खड्यासारखं बाजूला करणार”
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा (Sharad Pawar) नेमका कोणावर रोख आहे यावरून चर्चा रंगली आहे. तसेच गद्दारांना पक्षात स्थान नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तर भविष्यात अशा माणसांना बाजूला करण्यात येईल, असे स्पष्ट संकेतही शरद पवारांनी दिले आहेत.
आमच्यापासून जे काही सहकारी विचारांनी सोबत होते. ते आता परत येत आहेत. तेव्हा काहींना मला असे सहकारी पक्षात घेताना सावध होण्याचा सल्ला दिला असल्याचं शरद पवार म्हणाले. त्यानंतर ते पुढे म्हणाले की, आंब्याची आढी आहे, त्या आढीत सर्व आंबे चांगले आहेत. आणि एखादा आंबा नासका असल्यास सर्व आढी खराब होते. मी ती आढी कधीही खराब होऊ देणार नाही. नासका असेल तर त्या आंब्याला खड्यासारखं काढणार.
यावेळी अनेक शरद पवार गटाचे नेते, कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी यांनी चर्चा केली. शरद पवारांनी घटनेचा आधार घेत सावधगिरी करत आणि कोणी पक्षविरोधी जात असेल तर त्याला खड्यासारखं बाजूला करण्याचे संकेत दिले आहेत.
Marathi Title – Sharad Pawar Big Statement Ahead Of Vidhansabha Election Marathi New Update
महत्त्वाच्या बातम्या
घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान, ऐश्वर्याला अभिषेककडून मोठ सरप्राईज!
गुड न्यूज! आयफोन झाले स्वस्त, नव्या किमती ऐकून विश्वास बसणार नाही
राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट
तब्बल 16 वर्षांनंतर ‘या’ प्रसिद्ध कलाकाराने सोडली TMKOC मालिका!
‘भावी मुख्यमंत्री’, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज्यभरात झळकले बॅनर