Sharad Pawar-BJP | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. विधानसभेत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय. बोटावर मोजण्या इतके आमदार तिन्ही पक्षांचे निवडून आले आहेत. यानंतर ठाकरे गट आणि कॉँग्रेसमध्ये हिंदुत्वाच्या मुद्यावरून वाद दिसून आला. कोणत्या न कोणत्या कारणांवरून सध्या महाविकास आघाडीत लवकरच बिघाडी होणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच काल (12 डिसेंबर) दिल्लीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकुटुंब राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेतल्याने या चर्चेला आणखीनच उधाण आले आहे. (Sharad Pawar-BJP )
इतकंच नाही तर, या भेटीनंतर काल दुपारी देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलाय. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झालीये.
शरद पवार भाजपशी हातमिळवणी करणार?
4 डिसेंबरला दिल्लीत शरद पवार गटाच्या खासदारांची महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत आपण सत्तेत गेले पाहिजे, असा मुद्दा काही जणांनी मांडल्याची माहिती आहे. शरद पवार गटाने आपले स्वतंत्र अस्तित्व ठेऊन भाजपसोबत सत्तेत सामील व्हावे, असे एका गटाचे म्हणणे आहे. तर, दूसरा गट हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या मताचा आहे.
असं झाल्यास महाविकास आघाडीला अर्थच उरणार नाही. आघाडी ही राहणारच नाही. काल दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्याने शरद पवार यांच्या गटातील नेत्याकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व पुढील काळातील शरद पवारांची भूमिका काय असणार, याबाबत सर्व माहिती घेतली असल्याचं समजत आहे. याबाबत अधिकृत असं भाष्य कोणत्याच नेत्याने केलेलं नाही. मात्र, काही मीडियाने याबाबत दावा केलाय. (Sharad Pawar-BJP )
महाविकास आघाडीत होणार बिघाडी?
काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे (ठाकरे) सचिव मिलिंद नार्वेकर यांनी (6 डिसेंबररोजी) एक्सवर एक पोस्ट केली होती. बाबरी मशिद विध्वंसाला 32 वर्षे पूर्ण झाली या पार्श्वभूमीवर त्या घटनेचं समर्थन करणारी पोस्ट नार्वेकरांनी एक्सवर केली होती.मात्र, याच पोस्टवर कॉँग्रेसचे रईस शेख यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून आघाडीतील हे मतभेद समोर येत आहेत. त्यातच शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीने राज्यात नवीन राजकीय समीकरणे जुळणार का?, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
काल (12 डिसेंबर) शरद पवार यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाचे औचित्य साधून अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल देखील उपस्थित होते. (Sharad Pawar-BJP )
News Title – Sharad Pawar-BJP Meeting of two big leaders in Delhi
महत्त्वाच्या बातम्या-
काळजी घ्या! राज्यात ‘या’ तारखेपासून गारठा वाढणार?
गेल्यावर्षी 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमने मिळणारं सोनं आज पोहोचलं ‘इतक्या’ हजारांवर!
भाजप अजितदादा-एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का?, आतली बातमी समोर
आज भोलेनाथ ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!
पवारसाहेब आणि अजितदादा पुन्हा एकत्र येणार?