Top News महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख होतोय पाहून शरद पवार संतापले अन्…..

मुंबई |  सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात काही वृत्तवाहिन्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टार्गेट करायला सुरूवात केली आहे. एका वृत्तवाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख देखील केला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना फोन करून त्यांच्याजवळ वृत्तवाहिन्यांच्या भूमिकेसंदर्भात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलीये.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या रोखठोक सदरात शरद पवार यांच्या फोनवरच्या संवादाचा तपशील दिला आहे. तसंच मुख्यमंत्र्यांच्या एकेरी उल्लेखावरून शरद पवार नाराज झाल्याचंही राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत यांनी म्हटलंय, “मुख्यमंत्र्यांचा सरळ एकेरी भाषेत उल्लेख करतात, बदनामीकारक भाषा वापरतात, धमक्या देतात. सोनिया गांधींच्या बाबतीत त्यांनी हेच केले व आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून आव्हानाची भाषा करतानाही त्यांना लोकांनी पाहिले. हे सर्व पाहिल्यावर श्री. शरद पवार यांनी मला फोन केला”

”एका वृत्तवाहिनीवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरी भाषेत होतोय. हे बरोबर नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ही फक्त एक व्यक्ती नसते, तर संस्था असते. ‘Institute’ असा उल्लेख त्यांनी केला. शेवटी त्यांनी प्रश्न केला, मग सरकार काय करते? पवार यांचे मत एका अनुभवी नेत्याचे मत आहे. पत्रकारितेचे हे चित्र चांगले नाही. एक वृत्तवाहिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत गरळ ओकते व ते सहन केले जाते. त्या वृत्तवाहिनीस महाराष्ट्रातील राजकीय पक्ष बळ देतात. सुशांतसिंह हे निमित्त व त्या निमित्ताने सरकार बदनाम करायचे हे मुख्य कारस्थान. ते सुरूच आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह

संरक्षण खातं बनणार आत्मनिर्भर; राजनाथ सिंह यांनी केली मोठी घोषणा…

शरद पवार आज सातारा दौऱ्यावर, जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या