बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; विविध विषयांवर अर्धा तास चर्चा

मुंबई | गुरूवारी सह्याद्री अतिथीगृहात एक शेतीविषयक बैठक पार पडली होती. या बैठकीदरम्यान पवारांनी मुख्यमंत्र्यांचं तोंडभरून कौतुक केलं होतं. सह्याद्रीवर झालेल्या या बैठकीनंतर शरद पवारांनी मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. 19 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

येत्या 19 जुलैपासून संसदेच्या अधिवेशनाला सुरवात होत आहे. राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, कैकाडी समाजाचे आरक्षण त्याचबरोबर कृषी कायद्यांसदर्भात ठराव करून केंद्र सरकारकडे याविषयी मागणी केली होती. महाराष्ट्राच्या हिताचे मुद्दे महाविकास आघाडीच्या खासदारांनी उचलावेत अशी सल्ला शरद पवारांनी यावेळी केल्याची माहिती समोर येत आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने सादर केलेले कृषी विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. शेतकरी संघटनांच्या वतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटलो असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. शरद पवार कृषी कायद्याच्या संदर्भात स्वतः जातीनं लक्ष देत आहेत. त्यामुळे देखील ही बैठक चर्चेत आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासूून विधानसभा अध्यक्षांच्या मुद्द्यांवरून रान पेटलं आहे. तुमच्याकडे बहुमत असेल तर निवडणूक घेण्यास अडचण काय आहे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी काल उपस्थित केला होता. त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीवर गंभीरपणे चर्चा झाली असल्याचं समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या-

आयटी क्षेत्रातील ‘ही’ दिग्गज कंपनी 35 हजार जणांना नोकर्‍या देणार!

राहुल वैद्य आणि दिशा परमारची लगीनघाई; हळद, मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

आषाढी वारी निमित्त मृण्मयी देशपांडेचा मराठमोळा साज, पाहा फोटो!

दिलासादायक! पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More