शरद पवार 2019ला पंतप्रधान होऊ शकतात, कार्यकर्त्यांनी कामाला लागा!

कर्जत | 2019मध्ये शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात, असं महत्त्वपूर्ण वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. 2019 हे साहेबांचे आणि राष्ट्रवादीचं वर्ष राहिल, असंही ते म्हणाले.

रायगडमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीत ते बोलत होते. सध्या राजकारण ज्या दिशेने बदलत आहे त्याप्रमाणे आमच्या मनात पवार साहेबांबद्दल जी इच्छा आहे ती गोष्ट अशक्य नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

2019मध्ये शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचं आवाहनही केलं.