नाशिक | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा नाशिक दौरा अचानक रद्द केला आहे. नाशिक दौरा रद्द करून शरद पवार मुंबईकडे रवाना झाल्याचं कळतंय. उद्या शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची महत्वाची बैठक बौलावली आहे.
भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातले मतभेद समोर येत आहेत. यापार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मंत्र्यांची बेठक बोलवल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यातील वकिलांच्या परिषदेच्या समारोप कार्यक्रमासाठी शरद पवार नाशिकमध्ये येणार होते. मात्र शरद पवार यांनी हा दौरा अचानक रद्द केला आहे.
दरम्यान, एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हे विषय वेगवेगळे आहेत. केंद्र सरकारने हा तपास एनआयएकडे देणं म्हणजे त्यांना काही गोष्टी लपवाच्या झाकायच्या आहेत, असा आरोप शरद पवारांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
पवार साहेबांना ओळखायला दहा जन्म घ्यावे लागतील- धनंजय मुंडे
केजरीवालांची फुकट योजना महाराष्ट्रात नको- अजित पवार
महत्वाच्या बातम्या-
कारवाई केली तर इंदुरीकरांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू- सुरेश धस
कोरेगाव-भीमा प्रकरणाची माहिती लपवण्याचा केंद्राचा डाव- शरद पवार
अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान!
Comments are closed.