बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खुद्द शरद पवार साताऱ्यात दाखल! शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर बंद दाराआड खलबतं

सातारा | राज्यातील बहुतांश जिल्हा मध्यवर्ती बॅंकांचा निकाल घोषित झाला आहे. सातारा जिल्हा बॅंक (Satara District Bank Election) निवडणुकीत दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. परिणामी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा साताऱ्याचं राजकारण गाजत आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. शशिकांत शिंदे यांना रांजणे यांच्याकडून अवघ्या एका मतानं पराभव पत्करावा लागला आहे.

शशिकांत शिंदे यांना आपल्याच पक्षाच्या नेत्यांनी पराभवाचा धक्का दिल्याचं सध्या साताऱ्यात बोललं जात आहे. शशिकांत शिंदे यांनी पराभवानंतर चौफेर टीका केली आहे. शशिकांत शिंदे यांच्याशी पराभवावर चर्चा करण्यासाठी दस्तूरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे साताऱ्यात दाखल झाले आहेत. साताऱ्याच्या विश्रामगृहात शशिकांत शिंदे आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आहे.

शशिकांत शिंदे हे साताऱ्यातील राष्ट्रवादीचे मातब्बर नेते मानले जातात. साताऱ्यात जेव्हा 2019 विधानसभा निवडणुकीत शिंदे यांचा पराभव झाला होता तेव्हा सुद्धा शरद पवार हेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले होते. आताही शरद पवार यांनी शिंदे यांच्या पराभवावर सुचक वक्तव्य केलं आहे. पक्षातील गटबाजीवर भाष्य करणं पवार यांनी टाळलं आहे.

दरम्यान, जवळी या भागातून शशिकांत शिंदे यांचा हा सलग दुसरा पराभव आहे. शिंदे यांच्या हस्तकाचा त्यांच्या पराभवात मोठा हात असल्याची चर्चा सध्या साताऱ्यात रंगली आहे. गटबाजीचा फटका शिंदे यांना बसल्याचं राष्ट्रवादीचे नेते खासगीत बोलत आहेत.

थोडक्यात बातम्या 

लय जबरी पाऊस होणार!, महाराष्ट्रातील ‘या’ 6 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

शाहरुख-गौरीचं टेन्शन मिटलं, कजरारे गाण्यावर दोघंही तुफान नाचले!, पाहा व्हिडीओ

चंद्रपूरच्या तरुणीनं अनेकांना फोडलाय घाम, पहिल्यांदा द्यायची नयनसूख अन् त्यानंतर…

पुण्यात मोठी खळबळ, तृतीयपंथीयासोबत घडला अत्यंत निर्घृण प्रकार

“तुझं नशिब नाहीतर…”, गंभीरनं कॅप्टनवरच टीका केल्यानं क्रिकेट जगतात मोठी खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More