Top News

भाजपच्या डोक्यातील सत्तेची मस्ती या निवडणुकीत उतरवणार- शरद पवार

सातारा | भाजपच्या डोक्यामध्ये सत्तेची मस्ती शिरली आहे. ती या निवडणुकीत उतरवायची आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर सभा भरवण्यात आली होती. यावेळी पवार बोलत होते.

बारामतीच काय पण महाराष्ट्रातील इतर मतदारसंघातही भाजपला बाप जन्मात यश मिळवू देणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, यावेळी शरद पवारांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. शेतकऱ्यांसाठी या सरकारने काहीही ठोस केलेलं नाही, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

-विरोधक झोपेतही माझ्या नावाने ओरडत असतील- शरद पवार

-आरएसएसकडे युद्धासाठी लागणारी सर्व हत्यारे- प्रकाश आंबेडकर

-संजय राऊत म्हणतात, साध्वी प्रज्ञासिंह यांची व्यथा आपण समजून घेतली पाहिजे

-ज्यांना 10 वर्ष पुण्यात मेट्रो आणता आली नाही त्यांनी श्रेयासाठी भांडू नये-गिरीश बापट

-रावसाहेब दानवेंना सर्वात मोठा धक्का; बच्चू कडूंनी घेतला हा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या