महाराष्ट्र मुंबई

उपमुख्यमंत्री माझ्या शब्दाबाहेर नाही आणि मुख्यमंत्री…- शरद पवार

कोल्हापूर | एसटी कामगारांचे प्रश्न सोडवायचे असतील तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन महत्वाच्या व्यक्ती आहेत. यातील उपमुख्यमंत्री माझ्या शब्दाबाहेर नाही आणि मुख्यमंत्री परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शब्दाबाहेर नसल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे.

तुम्ही एसटी कामगारांच्या प्रश्नावर बैठक बोलवा. त्या बैठकीला मलाही बोलवा. त्यामुळे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांचं नक्की जमेल, असं शरद पवार यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये आयोजित महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या 56 व्या राज्यव्यापी अधिवेशनात शरद पवारांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी राऊतांकडून जबाबदारी काढून परबांकडे दिली. त्यामुळे अधिवेशनात उत्साह दिसत असल्याचं म्हणत पवारांनी 4 वर्ष एसटी कामगारांच्या अधिवेशनाला उपस्थित न राहणाऱ्या दिवाकर रावते यांना टोला लगावला.

 

ट्रेंडिंग बातम्या-

शरद पवारांचं गृहमंत्र्यांना पत्र; पोलिसांसाठी केली ‘ही’ मागणी

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदूरीकर महाराजांना पहिला झटका!

महत्वाच्या बातम्या-

“सावरकरांबद्दल जे लिहिलंय ते ऐतिहासिक वस्तुस्थितीला धरूनच; मासिक मागे घेणार नाही”

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदूरीकर महाराजांना पहिला झटका!

‘सत्ता जाऊन सहा वर्षे झाली तरी अनेकजण मंत्र्यासारखेच वागतात’; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या