जनता मग्रुरी सहन करणार नाही; शरद पवारांची भाजपवर टीका

नवी दिल्ली | जनता कोणाचीही मग्रुरी सहन करणार नाही हे निकालातून दिसतं, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.   

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजपला फटका बसला असून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

भाजपला छत्तीसगड आणि राजस्थानमधील सत्ता गमवावी लागण्याची शक्यता असून मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर निर्माण झाली आहे.

दरम्यान, आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाच राज्यांच्या निवडणुकांना महत्व प्राप्त झाले होते.

 महत्वाच्या बातम्या –

-राम मंदिर सोडा आणि विकासाची कास धरा; खासदार संजय काकडेंचा मोदींना सल्ला

-मुख्यमंत्री वसुंधरा राजे स्वतः सावरल्या; मात्र भाजपची नौका बुडवली!

-समझदार को इशारा काफी है; संजय राऊतांचा मोदींना टोला

-कार्यालयात झेंडे लावून भाजप कार्यकर्ते कुठे गेले?

भाजपला दणके बसताच मोदी हादरले; निवासस्थानी बोलावली तातडीची बैठक