पुणे महाराष्ट्र

भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांबद्दल शरद पवारांचा मोठा दावा

पुणे | भाजपच्या सत्तेमुळे ज्यांना निवडून यायची खात्री नाही, तेच लोक भाजपमध्ये चालले आहेत. शिवाय त्यांना ईव्हीएमचीही चिंता आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

जे लोक भाजपमध्ये जात नाहीत, त्यांना ईडीची भिती दाखवली जात आहे. हसन मुश्रीफ यांनी भाजपमध्ये यायला नकार दिला की लगेच त्यांच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड टाकण्यात आली, असंही पवारांनी म्हटलं आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे बडे नेते सध्या भाजप-सेनेला जवळ करत आहेत. यावरच बोलताना शरद पवार यांनी नेत्यांच्या जाण्याने पक्षाला काहीही फरक पडणार नाही, आम्ही तरूणांना संधी देऊ असंही पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मी पक्षातील सर्वांनाच आपलं मानतो, कुटुंबाचा भाग मानतो. जे गेलेत ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या माझ्याशी बोलून गेलेत. पण कोणाच्याही जाण्याने राष्ट्रवादीला काहीही फरक पडत नाही, असं मत पवारांनी पक्षातून होणाऱ्या पक्षांतराबाबत व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-गेलेत त्यांना जाऊ द्या… तरूणांना संधी देऊ- शरद पवार

-प्रमुख मार्गदर्शक असलेल्या शरद पवारांची ‘या’ पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याकडे पाठ!

मुलाच्या भाजपप्रवेशाचं मधुकर पिचड यांच्याकडून समर्थन; म्हणतात…

-भाजपात प्रवेश करताना पिचड म्हणतात, मी पवारांचे उपकार कधीही फेडू शकत नाही!

-…म्हणून भाजपने जोरात इनकमिंग चालवलंय- सुशीलकुमार शिंदे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या