मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे- शरद पवार

बारामती | मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

धनगर, मराठा, मुस्लिम आरक्षणाबाबतीत घेतलेले कोणतेच निर्णय कोर्टात टिकणार नाही, अशी भूमिका या सरकारने  घेतली असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. ते बारामतीमध्ये बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 ला जनतेला वेगवेगळी आश्वासनं दिली. मात्र गेल्या पाच वर्षात त्याचं काहीही करता आलं नसल्याने मोदी मूळ प्रश्नांपासून लोकांची दिशाभूल करत आहेत, असं म्हणत पवारांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, हे सरकार लोकांच्या अपेक्षा भंग करून आरक्षणाचा मुद्दा झूलवत ठेवत आहे, असा आरोप पवारांनी भाजप सरकारवर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सुजयच्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; साकळाई योजना पूर्ण करणारच!

-जालन्यात रावसाहेब दानवेंचा कस लागणार; औताडे मुसंडी मारण्याची शक्यता

-भाजपलाच मतदान करा, मोदींनी कॅमेरे लावले आहेत; भाजप आमदाराची धमकी

ज्यांना गरिबी हटवायला जमली नाही ते विकास काय करणार; बापटांचा काँग्रेसवर घणाघात

-2019 माझी शेवटची निवडणूक; भरघोस मतांनी मला विजयी करा- सुशीलकुमार शिंदे