अडचणीच्या काळात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा मोलाचा सल्ला

अडचणीच्या काळात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा मोलाचा सल्ला

पुणे | जे गेलेत त्यांना जाऊ द्या… तरूण कार्यकर्ते चांगलं आणि नेटाने काम करत आहेत. त्यांना संधी देता येईल, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार पक्ष सोडून जात आहेत. यावरच  शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

1980 च्या विधानसभा निवडणकीमध्ये माझे 60 आमदार निवडून आले होते. मी काही कामानिमित्त परदेशात गेलो होतो. त्यावेळी सत्तेची लाच आणि आमिष दाखवून काहींनी आमदार फोडले. मग माझ्याबरोबर फक्त 6 आमदार राहिले. त्यानंतर मात्र 1985 च्या निवडणुकीमध्ये मी 6 चे 60 आमदार निवडून आणले आहेत हे विसरू नका, असं शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, पक्षातील आमदार सोडून गेेले तरी पक्षाला काहीही फरक पडणार नाही. त्याचाच परिपाक म्हणून पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत तरूणांना अधिक संधी देता येईल, असं पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-प्रमुख मार्गदर्शक असलेल्या शरद पवारांची ‘या’ पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याकडे पाठ!

मुलाच्या भाजपप्रवेशाचं मधुकर पिचड यांच्याकडून समर्थन; म्हणतात…

-भाजपात प्रवेश करताना पिचड म्हणतात, मी पवारांचे उपकार कधीही फेडू शकत नाही!

-…म्हणून भाजपने जोरात इनकमिंग चालवलंय- सुशीलकुमार शिंदे

-“अडचणीचा काळ असला तर काय झालं, आम्ही साहेबांच्या सोबत आहोत”

Google+ Linkedin